bandkam kamgar diwali bones:सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगार व्यक्तिंसाठी एक आनंदवार्ता आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये अशी माहिती हाती लागली आहे. मंत्रिमंडळात तशाप्रकारचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस 5 हजार रुपये
येथे पहा गावानुसार लाभार्थी यादी
नोंदणीचे नुतनीकरण करणे आहे आवश्यक
बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये मात्र त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करणे आवश्यक आहे. ती बाब म्हणजे आपण जर आपल्या बांधकाम कामगार नोंदणीचे नुतनीकरण केले नसेल तर ते करून घ्यावे लागेल. अन्यथा आपण लाभापासून वंचित राहाल. बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या विविध योजना सरकारद्वारा अमलात आणल्या जातात.
आता केंद्र सरकारकडून घरे बांधण्यासाठी बांधकाम तसेच इतर कामगारांना दोन लाख रुपये जाहीर केले आहेत. आता बांधकाम कामगारांना अशाप्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच दरवर्षी न चुकता बांधकाम कामगार नूतनीकरण करून घेणे सुद्धा अतिशय आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त नोंदणीचे नुतनीकरण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये. मात्र यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत.
बांधकाम कामगार शिष्टमंडळाच्या मागणीला यश
नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा 5 हजार रुपये बोनस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. दिवाळीपुर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळावा यासाठी 8 ऑक्टोबर 2024 रोजी कृती समितीने आझाद मैदानात आंदोलन करून ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने या आंदोलनाला यश मिळाले आणि आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये.
त्यानंतर कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून सदर बाब शासनाच्या दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले होते. बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रधान सचिवांना दिली त्यावर निर्णय केल्या जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला श्रीमती सिंगल यांच्याकडून देण्यात आले होते.
याशिवाय साधारणपणे एका महिन्या अगोदर कामगार मंत्री सुरेश खाडे यांना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात यावा असे निवेदन सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केले होते. परिणामी बांधकाम कामगार शिष्टमंडळाला याबाबत यश मिळाले असून या दिवाळीत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये निधी.
इतक्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये bandkam kamgar diwali bones
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कल्याणकारी मंडळामधील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस ५ हजार रुपये इतके अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून 10 ऑक्टोबर 2024 अखेर मंडळामध्ये नोंदित (जिवित) असलेले 28 लाख 73 हजार 568 तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी आणि नुतनीकरण करण्यासाठी प्राप्त झालेल्या 25 लाख 65 हजार 17 अशा एकुण 54 लाख 38 हजार 585 बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये, अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांधकाम कामगारांना पेटी संच तसेच घरगुती भांडी संच सुद्धा वाटप करण्यात येत असतो. आता यंदाच्या वर्षी बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रूपये. इतक्या सगळ्या सुविधा बांधकाम कामगारांचा आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारकडून तत्परतेने पाठपुरावा करण्यात येतो. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला 30 पेक्षा जास्त कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजना कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
जे बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील तसेच ज्या इमारत बांधकाम कामगारांनी त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण केलेले असेल फक्त अशाच इमारत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये याची सर्वांनी नोंद घ्यावी. निष्क्रिय बांधकाम कामगारांना हा बोनस मिळू शकणार नाही. तरी जे कोणी इमारत बांधकाम कामगार त्यांची नोंदणी अद्ययावत करायचे बाकी असतील त्यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन नोंदणीचे नुतनीकरण करून घेता येईल.