SBI Bank देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देत आहे. याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojna) 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन या सुविधा पुरवते.